अरेंज्ड मॅरेज करताना मुलींनी आवर्जुन जाणून घ्याव्यात मुलांबाबत या गोष्टी!
सध्याच्या लव्ह मॅरेजच्या जमान्यात आजही अनेक जण असे आहेत जे अरेंज्ड मॅरेजवर विश्वास ठेवतात. खासकरून मुली ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य करियरला वाहीलेलं असतं, त्यांना अजिबात प्रेमात पडायला वगैरे वेळ मिळालेला नसतो किंवा आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न करायचं नसतं, त्या मुलींची अरेंज्ड मॅरेज करून छानसा जोडीदार निवडायची इच्छा असते. आज त्याच मुलींना उपयोगी पडेल असा हा लेख आम्ही घेऊन आलो आहोत. ज्यात आम्ही सांगणार आहोत काही असे प्रश्न जे अरेंज्ड मॅरेज करू इच्छीणाऱ्या प्रत्येक मुलीने आपल्या भावी जोडीदाराला अर्थात मुलाला विचारायला हवेत आणि मगच त्याची निवड करायला हवी. कारण शेवटी लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय असतो. हा निर्णय चुकला तर सगळं आयुष्य उध्वस्त होऊ शकतो. म्हणूनच त्या आधी काही शहानिशा करून मग सारासार विचार करून निर्णय घेतलेला योग्य! तुम्ही दबावात येऊन लग्न करत आहात का? तुम्ही दबावात येऊन लग्न करत आहात का? हा प्रश्न मुलीने सगळ्यात प्रथम मुलाला विचारावा कारण बऱ्याचदा मुलींसारखे दबावात येऊन काही तरुण लग्नासाठी तयार होतात. अशावेळी त्यांची लग्नाची इच्छा नसते केवळ आई वडिलांच्या इच्छेखातर ते लग्नासाठी तयार झालेले असतात. पण अशा बाबतीत मुलगा कितीही सुंदर व श्रीमंत का असेना, जर या प्रश्नाचं त्याने हो असं उत्तर दिले असेल तर अशा मुलाला जोडीदार म्हणून निवडण्याची चूक अजिबात करू नका. दबावात येऊन केलेलं लग्न कितपत टिकेल हा मोठा प्रश्न असतो. एक पत्नी म्हणून तुम्ही त्याच्यावर जीवापाड प्रेम कराल, पण लग्न त्याच्या मर्जीविरुद्ध झालं असेल वा त्याच्या मनात दुसरी कोणती मुलगी असले तर संसार हा जास्त काळ सुखाने टिकू शकत नाही. (वाचा :- ब्रेकअपमुळे निराश आहात? अशी करा आयुष्याची नव्याने सुरुवात!) करियरबाबत काय योजना आहेत? आपला जोडीदार किती प्रेमळ आहे हा विचार मुली सगळ्यात पहिला करतात. त्याने आपल्याला खूप प्रेम द्यावं हि त्यांची एकमेव इच्छा असते. पण मुलींनी फक्त हा विचार करून जोडीदार निवडू नये. कारण या काळात फक्त प्रेम नाही तर पैसा सुद्धा हवा आणि हा पैसा तेव्हाच असले जेव्हा तुमचा जोडीदार करियरच्या दृष्टीने सक्षम असेल. त्याला आयुष्यात किती पुढे जायचं आहे हे पहिल्या भेटीत जाणून घ्या. त्