खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे १००० पेक्षा जास्त Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजिना मराठी मध्ये.
Happy Birthday Wishes in Marathi
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
Download
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!